श्री नवरात्री देवीची आरती – उदो बोला उदो अंबा बाई माउलीचा हो
उदो बोला उदो अंबा बाई माउलीचा हो उदोकार गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो || धृ || अश्विन शुद्धपक्षी अंबा बैसली सिंहासनी हो प्रतिपदेपासून घटस्थापना ती करुनी हो मूलमंत्र - जप करुनी भोवत रक्षक ठेवुनी हो ब्रह्म विष्णू रुद्र आईचे पूजन करिती हो || १ || द्वितीयेचे दिवशी मिळती चौषष्ठ योगिनी हो सकळामध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो कस्तुरी मळवट भांगी शेंदूर भरुनी हो उदो:कार गर्जती सकळ चामुंडा मिळूनी हो || २ || तृतीयेचे दिवशी अंबे शृंगार मांडीला हो मळवट पातळ चोळी कंठी हार मुक्ताफळा हो कणकेचे पदके कासे पितांबर पिवळा हो अष्टभुजा मिरविसी अंबे सुंदर दिसे लीला हो || ३ || चतुर्थीचे दिवशी विश्व व्यापक जननी हो उपासका पाहसी माते प्रसन्न अंत:करणी हो पूर्णकृपे जगन्माते पाहसी मनमोहनी हो भक्तांच्या माउली सूर ते येती लोटांगणी हो || ४ || पंचमीचे दिवशी व्रत ते उपांग ललिता हो अर्ध पाद्य पूजेने तुजला भवानी स्तवती हो रात्रीचे समयी करती जागरण हरीकथा हो आनंदे प्रेम ते आले सद् भावे ते ऋता हो || ५ || षष्ठीचे दिवशी भक्ता आनंद वर्तला हो घेउनि दिवट्या हाती हर्षे गोंधळ घातला हो कवडी एक अर्पिता देशी हार मुक्ताफळा...