Posts

श्री नवरात्री देवीची आरती – उदो बोला उदो अंबा बाई माउलीचा हो

  उदो बोला उदो अंबा बाई माउलीचा हो उदोकार गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो || धृ || अश्विन शुद्धपक्षी अंबा बैसली सिंहासनी हो प्रतिपदेपासून घटस्थापना ती करुनी हो मूलमंत्र - जप करुनी भोवत रक्षक ठेवुनी हो ब्रह्म विष्णू रुद्र आईचे पूजन करिती हो  || १ || द्वितीयेचे दिवशी मिळती चौषष्ठ योगिनी हो सकळामध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो कस्तुरी मळवट भांगी शेंदूर भरुनी हो उदो:कार गर्जती सकळ चामुंडा मिळूनी हो || २ || तृतीयेचे दिवशी अंबे शृंगार मांडीला हो मळवट पातळ चोळी कंठी हार मुक्ताफळा हो कणकेचे पदके कासे पितांबर पिवळा हो अष्टभुजा मिरविसी अंबे सुंदर दिसे लीला हो || ३ || चतुर्थीचे दिवशी विश्व व्यापक जननी हो उपासका पाहसी माते प्रसन्न अंत:करणी हो पूर्णकृपे जगन्माते पाहसी मनमोहनी हो भक्तांच्या माउली सूर ते येती लोटांगणी हो || ४ || पंचमीचे दिवशी व्रत ते उपांग ललिता हो अर्ध पाद्य​ पूजेने तुजला भवानी स्तवती हो रात्रीचे समयी करती जागरण हरीकथा हो आनंदे प्रेम ते आले सद् भावे ते ऋता हो || ५ || षष्ठीचे दिवशी भक्ता आनंद वर्तला हो घेउनि दिवट्या हाती हर्षे गोंधळ घातला हो कवडी एक अर्पिता देशी हार मुक्ताफळा...

श्री गणपति आरती ganpati arti

सुखकर्ता दुखहर्ता / गणपति आरती सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची| नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची| सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची| कंठी झरके माल मुक्ताफळाची || १ || जय देव जय देव जय मंगलमूर्ती| दर्शनमात्रे मनकामना पुरती|| रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा| चंदनाची उटी कुंकुमकेशरा| हिरे जडित मुकुट शोभतो बरा| रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया || 2 || लंबोदर पितांबर फनी वरवंदना| सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना| दास रामाचा वाट पाहे सदना| संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना| जय देव जय देव जय मंगलमूर्ती| दर्शनमात्रे मनकामना पुरती || ३ ||

DURGA DEVI ARTI

श्री दुर्गा देवीची आरती \n \n दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी।\n अनाथ नाथे अम्बे करुणा विस्तारी।\n वारी वारी जन्म मरणांते वारी।\n हारी पडलो आता संकट निवारी॥\n \n जय देवी जय देवी महिषासुरमथिनी।\n सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी॥\n \n त्रिभुवन-भुवनी पाहता तुज ऐसी नाही।\n चारी श्रमले परन्तु न बोलवे काही।\n साही विवाद करिता पडले प्रवाही।\n ते तू भक्तालागी पावसि लवलाही॥\n \n जय देवी जय देवी महिषासुरमथिनी।\n सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी॥\n प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासा।\n क्लेशांपासुनि सोडवि तोडी भवपाशा।\n अम्बे तुजवाचून कोण पुरविल आशा।\n नरहरी तल्लिन झाला पदपंकजलेशा॥\n \n जय देवी जय देवी महिषासुरमथिनी।\n सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी॥\n